Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा परिषदेच्या शाळा बनल्या जुगार अड्डा

जिल्हा परिषदेच्या शाळा बनल्या जुगार अड्डा 


आम आदमी पार्टीच्या पदाधिकार्‍यांकडून शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि शाळेतील समस्या सोडवता याव्या या उद्देशाने कारंजा तालुयात शाळा तपासणी मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने आप च्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी, १८ जून रोजी कारंजा तालुयातील भडशिवनी आणि सिंगणापूर येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली यावेळी एक भयानक वास्तव समोर आले. ते म्हणजे या दोन्ही गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळात जुगार सुरू असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यामुळे कारंजा तालुयातील जिल्हा परिषदेच्या शाळा जुगार अड्डा तर बनल्या नाहीत ना असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मागील काही दिवसांपासून आपचे राज्य संघटन सचिव अ‍ॅड. मनीष मोडक यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत आप चे पदाधिकारी तालुयातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देऊन त्या शाळेतील समस्या जाणून घेत आहेत. त्या अनुषंगाने भडशिवणी आणि सिंगणापूर येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देण्यात आली. यावेळी शाळेत स्थानिक काही जण जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. परंतु आप चे पदाधिकारी शाळेत प्रवेश करताच तास चे पत्ते व पैसे टाकून जुगारी पळून गेले. तसेच अनेक शाळात विविध समस्या असल्याचे आणि ते सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे अ‍ॅड. मनीष मोडक यांनी सांगितले, या शाळांमध्ये इमारती पडया आहेत .शिवाय स्वच्छता ठेवल्या जात नसल्याचे सुद्धा दिसून आले.

सद्य परिस्थितीत शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने जुगारी प्रवेशद्वारावरून किंवा कुंपणाच्या भिंतीवरून शाळेत प्रवेश मिळवितात आणि दिवसभर जुगार खेळतात एवढेच नव्हे तर शाळा सुरू असताना देखील सुट्टीच्या दिवशी हे जुगारी शाळेत जुगार भरवतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था बिकट होण्याला जबाबदार कोण असा सवाल मोडक यांनी उपस्थित केला आहे. कारंजा तालुयातील जिल्हा परिषद शाळांचे चित्र बदलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी सुद्धा आप चे मनीष मोडक यांनी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.