तैवानच्या क्लबमध्ये महिलांच्या नग्न शरीरावर वाढले जेवण; किंमत अडीच लाख प्रति व्यक्ती, जाणून घ्या काय आहे 'न्योताईमोरी' प्रथा
जगात अशी अनेक महागडी हॉटेल्स-रेस्टॉरंट्स आहेत जिथे अगदी सोन्या-चांदीच्या ताटामध्ये जेवण वाढले जाते. या ठिकाणी श्रीमंतांच्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेतली जाते. आता तैवानमधील अशाच एका महागड्या प्रायव्हेट क्लबमधून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. या ठिकाणी पाहुण्यांसाठी चक्क नग्न महिलांच्या शरीरावर जेवण वाढण्यात आले आहे. ही बाब निदर्शनास येताच क्लबविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या खास जेवणासाठी क्लबने ग्राहकांकडून तब्बल अडीच लाख प्रति व्यक्ती अशी मोठी रक्कम घेतली.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ताइचुंग या किनारपट्टीवरील शहरातील एका खाजगी क्लबमध्ये न्योताईमोरी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. न्योताईमोरी म्हणजे ‘बॉडी सुशी’, जी एक जपानी प्रथा आहे. यामध्ये स्त्रीच्या नग्न शरीरावर साशिमी किंवा सुशी वाढली जाते. तैवानच्या या क्लबमध्ये असेच नग्न महिलेच्या शरीराचा वापर ‘सुशी बोट’ म्हणून करण्यात आला.
या डिनरचे काही फोटोज ऑनलाइन लीक झाले असून, त्यामध्ये दिसत आहे की, एका नग्न स्त्रीचे शरीर फुलांनी सजवले आहे व तिच्या शरीरावर खाद्यपदार्थ ठेवले आहेत. साधारण 20 पेक्षा जास्त पाहुणे या नग्न शरीरावरून जेवण करत आहेत. हे फोटोज समोर आल्यानंतर या क्लबवर मोठी टीका सुरु झाली. त्यानंतर आता स्थानिक अधिकाऱ्यांनी या खासगी क्लबची चौकशी सुरू केली आहे. सार्वजनिक आरोग्य आणि नैतिक समस्यांबद्दलच्या चिंतेचा हवाला देत, 2005 मध्ये चीन (तैवानवर नियंत्रण असल्याचा दावा करणाऱ्या) सह अनेक देशांमध्ये न्योताईमोरीवर बंदी आहे.
दरम्यान, न्योताईमोरीचा उगम एडो काळामध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. एडो कालावधी 1603 ते 1868 पर्यंतच्या वर्षांचा संदर्भ देतो, जेव्हा टोकुगावा कुटुंबाने जपानवर राज्य केले. एडो शहराच्या नावावरून (आधुनिक काळातील टोकियो) या युगाला ते नाव देण्यात आले. या काळात जपानी सेक्स वर्करच्या प्रायव्हेट पार्टसमध्ये तांदळाची वाइन ओतून तिचे सेवन केले जात असे. पुढे 1960 च्या दशकात जपानच्या आर्थिक वाढीमुळे, काही रिसॉर्ट्सद्वारे पुरुष ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही प्रथा पुन्हा सुरु करण्यात आली. मात्र यावेळी वाइनऐवजी स्त्रीच्या नग्न शरीरावर पदार्थ वाढण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.