Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जरांगेना सर्वात मोठा धक्का, गावाकऱ्यांनीच सोडली साथ, अंतरवालीसराटीतून थेट नकार

जरांगेना सर्वात मोठा धक्का, गावाकऱ्यांनीच सोडली साथ, अंतरवालीसराटीतून थेट नकार 


जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता अंतरवाली सराटीत उपोषण करु नये अशी मागणी अंतरवाली सराटीतल्या काही ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात आज या ग्रामस्थांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना भेटून तसं निवदेन दिलं आहे. मागच्या दहा महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत आहेत. त्यामुळं या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून, आता लोकं वैतागले आहेत. त्यामुळं जरांगे पाटलांचं 4 तारखेचं उपोषण स्थगित करावं. परवानगी देवू नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.


विशेष म्हणजे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध करणाऱ्या नागरिकांमध्ये जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता यावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंतरवाली सराटीमधीलच काही ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वातंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र अजूनही जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत, मात्र यावेळी त्यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीमधूनच विरोध होत आहे. या संदर्भात आज या ग्रामस्थांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना भेटून तसं निवदेन दिलं आहे. मागच्या दहा महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत आहेत. त्यामुळं या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून, आता लोकं वैतागले आहेत. त्यामुळं जरांगे पाटलांचं 4 तारखेचं उपोषण स्थगित करावं. परवानगी देवू नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.