Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना...', मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान!

'मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना...', मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान!

'मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागासवर्गीय (OBC) किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही,' असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'सत्ताधारी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती जनतेला फक्त आश्वासन देणार नाही. तर, विधानसभेच्या अधिवेशनात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा लाभ देणार आहे.'

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देण्यासाठी महायुती सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला विशेष अधिवेशन बोलावले होते. मनोज जरंगे यांच्या नेतृत्वाखाली मराठे ओबीसी प्रवर्गात आरक्षणाची मागणी करत आहेत, तर ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध करत आहेत."

मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीने (MVA) टीका केली आहे. तसेच, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.

यादरम्यान, 'सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणार नाही. सरकारने केलेली विकासकामे विरोधकांना दिसत नाही आहेत.' असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. तसंच, मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावत मुख्यमंत्री म्हणाले, 'महाराष्ट्र हे गुंतवणुकीचे ठिकाण बनले आहे.'


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.