हे संसदेतील चित्र तुम्हाला यापुढं नेहमी पाहायला मिळू शकतं. कारण राहुल गांधी लोकसभेचे नवे विरोधी पक्षनेते बनलेत. कौन राहुल? असं मोदी राहुल गांधींविषयी चेष्टेने बोलले होते. त्यामुळेच एकेकाळी राहुल गांधींची अशी चेष्टा करणाऱ्या पंतप्रधान मोदींना आता राहुल गांधींना रोजच राम राम करावा लागणार असल्याचा टोला संजय राऊतांनी हाणलाय.
एरवी गरजेपेक्षा कोणालाही जास्त महत्व न देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी चक्क राहुल गांधींशी हस्तांदोलन केल्याची चर्चा देशभर रंगलीय. पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांना परंपरेप्रमाणे आसनाकडे घेऊन गेले. त्यावेळी चक्क पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींशी हस्तांदोलन केलं.त्यामुळे पप्पू म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड होताच त्यांचं संसदेतील वजन काय असणार याची प्रचिती आली. इंडिया आघाडीने लोकांचा आवाज बनण्यासाठी दिलेल्या जबाबदारीला राहुल गांधी कितपत न्याय देतात? आणि सरकारला कोंडीत कसं पक़डतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.