Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपमध्ये घडामोडीना वेग, अमित शहा घेणार महाराष्ट्रात मोठा निर्णय?

भाजपमध्ये घडामोडीना वेग, अमित शहा घेणार महाराष्ट्रात मोठा निर्णय?


दिल्ली: लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचा दारूण पराभव झाला. अजूनही भाजपमध्ये पराभवाच्या कारणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आता भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात 5 जुलैला महाराष्ट्रात येणार आहे. विधानसभा निवडणुकांसाठी अमित शाह आढावा घेणारा असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन 45 असा नारा देत पूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये जोरदार प्रचार केला होता. पण भाजपला फक्त 9 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर आता अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंड आणि हरियाणा राज्यातही अमित शाह यांचा दौरा आहे.

सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी भुपेंद्र यादव यांच्यासह प्रभारी अश्विनी वैष्णव देखील मुंबईत दाखल होतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी संध्याकाळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार व इतर नेते उपस्थित असतील. महाराष्ट्र भाजपच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहण्याचं ठरणार आहे.

'राष्ट्रवादीमुळे आमचं वाटोळं झालं', भाजप आमदार भडकला
दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने आमचं वाटोळं झालं, अशी कबुली दिली आहे. तसंच अमोल मिटकरी, सुरज चव्हाण यांची भाजप-आरएसएसवर बोलण्याची लायकी नाही, अशी टीकाही सुरेश धस यांनी केली आहे.

'आमच्या युतीत तिसरा भिडू आला, हे जनतेला पटलं नाही. लोक आमच्या विरोधात का गेले? लोकांच्या मनात राग का निर्माण झाला? याचं कारणच हे आहे. राष्ट्रवादीला तुम्ही का घेतलं? त्यामुळे आमचं वाटोळं झालेलं आहे. आम्ही आतापर्यंत शांत होतो, आम्ही हसत हसत उत्तर दिलं होतं. सुरज चव्हाण आणि अमोल मिटकरी भाजप आणि आरएसएसवर बोलत असतील तर शांत राहणं बरोबर नाही. आरएसएस आणि भाजपवर बोलण्याइतकी त्यांची लायकी नाही', असं सुरेश धस म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.