लोकसभेची मतमोजणी आणि निकाल खूप अटीतटीचा सुरू आहे. थोड्याशा फरकाने भाजप आघाडीवर आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप काँटे की टक्कर सुरू आहे. भाजपचा 400 पारचा नारा फोल ठरणार अशी सध्याची आकडेवा री पाहता कयास लावला जात आहे. तर दुसरीकडे नीतीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारणार की काय अशी शंका उपस्थित झाली होती.
याच वेळी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आणि चंद्रबाबडू नायडू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. बिहार भाजपचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. मात्र तोपर्यंत नितीश जेवायला गेले होते. नितीशकुमार यांची भेट होऊ शकली नाही.
चंद्राबाबू आणि नीतीश कुमार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये नीतीश कुमार यांनी आपली भूमिक स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही NDA ला सपोर्ट करणार आहे. नीतीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये जेडीयू पक्ष पुन्हा एनडीएची साथ देईल असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. सध्या जेडीयू 15 जागांवर आघाडीवर आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचं नीतीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.