रामोजी ग्रूपचे फाऊंडर श्री रामोजी राव यांचे आज ८ जून रोजी निधन झाले आहे. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे त्यांना ५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी त्यांनी सकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोक पसरला आहे.
रामोजी राव यांच्याविषयी
रामोजी राव यांचे खरे नाव चेरुकुरी रामोजी राव असे होते. १६ नोव्हेंबर १९३६ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात रामोजी राव यांचा जन्म झाला. प्रचंड मेहनत घेत रामोजी राव यांनी बिझनेस उभा केला होता. तसेच त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी जगभरातील सर्वात मोठा फिल्म स्टुडीओ रामोजी फिल्म सिटी, ईटीवी नेटवर्क, डॉल्फिन हॉटेल्स, मार्गदर्शी चिटफंड आणि ईनाडू तेलुगु पेपर सुरु केला होता.
रामोजी राव यांच्या संपत्तीविषयी
रामोजी राव यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे ४.७ अरब डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम ४१, ७०६ कोटी रुपये आहे. रामोजी राव यांचे प्रोडक्शन हाभस आहे ज्याचे नाव उषाकिरण मूवीज असे आहे. या बॅनरखाली आजवर अनेक सुपरहिट तेलुगू सिनेमे प्रदर्शित झाले आहेत.२००२ मध्ये रामोजी राव यांनी रमादेवी पब्लिक स्कूलचीही स्थापना झाली. भारत सरकारने रामोजी राव यांना प्रतिष्ठेचा 'पद्मविभूषण' पुरस्कारही जाहीर केला. रामोजी राव यांनी चित्रपट रसिकांसाठी 'सितारा' मासिक सुरू केले. 'चतुरा' आणि 'विपुला' मासिकेही आणली. 'प्रिया फूड्स' सोबतच 'उषाकिरण मुव्हीज'ची स्थापना १८८३ मध्ये झाली. या बॅनरखाली अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. १९९० मध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये 'इनाडू स्कूल ऑफ जर्नलिझम'ही सुरू करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.