भोपाळ : मध्य प्रदेशातील रतलाममधील जावरा भागातील भगवान जगन्नाथ मंदिरा परिसरात दि. १४ जून रोजी गायीचे कापलेले शीर सापडले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलकांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याता इशारा दिला. ज्यानंतर लोकांची संतप्त प्रतिक्रिया पाहून पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांची घरे उद्धवस्त केली आहे.
भगवान जगन्नाथ महादेव मंदिराचे पुजारी सकाळी मंदिरात पोहचले. मंदिरात पोहचताच त्यांना गाईचे शीर कापलेले शीर दिसले. त्यांनी तात्काळ पोलीस आणि स्थानिक लोकांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांनेच्या लोकांनी आणि स्थानिक नागरिक मंदिरात पोहचले. यानंतर लोकांनी जावरा मार्केट बंद करून रास्ता रोको केला. तसेच आंदोलकांनी जावरा पोलीस ठाणे गाठून आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला.
दरम्यान, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही आरोपींची ओळख पटली आहे. जाकीर आणि शाकीर अशी आरोपींची नावे आहेत. एएसपी राकेश खाखा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये १३ आणि १४ जूनच्या रात्री २.४१ वाजता दोन कट्टरपंथी मोटारसायकलवरून आले आणि मंदिरात गोमांसाचे अवशेष टाकून पळून गेले. यानंतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून हल्लेखोरांना पकडण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.