Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"खोटे एक्स्झिट पोल दाखवायला सांगून मोदींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सांगितली ", राहुल गांधींचा गंभीर आरोप

"खोटे एक्स्झिट पोल दाखवायला सांगून मोदींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सांगितली ", राहुल गांधींचा गंभीर आरोप 


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकालापूर्वी जाहीर झालेले एक्झिट पोल आणि पंतप्रधानांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं केलेलं आवाहन हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. हा सर्वात मोठा घोटाळा असून ३० लाख कोटी रुपयांचं रिटेल गुंतवणुकदारांचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं याची संयुक्त संसदीय समितीद्वारे अर्थात जेसीपीद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

भाजपनं खोटे एक्झिट पोल जाहीर केले

पत्रकार परिषदेत बोलताना, पहिल्यांदा आम्ही हे निरिक्षण नोंदवलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अर्थमंत्र्यांनी देखील शेअर बाजारावर टिप्पणी केली होती. मोदी म्हणाले होते की, ४ जून रोजी शेअर मार्कोट आकाशाला गवसणी घालणार आहे, हाच मेसेज अर्थमंत्र्यांनी दिला. पण याच्यामध्ये एक क्रोनोलॉजी आहे, ते म्हणजे १ जूनला मीडियानं खोटे एक्झिट पोल जाहीर केले. भाजपच्या अधिकृत अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला २२० जागा मिळणार होत्या, इंटिलिजन्सनं भाजपला हा रिपोर्ट दिला होता.

मोदींनी अदानींना फायदा मिळवून दिला
१ जूनला एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर मोदींनी मोदींनी अदानींच्या दोन न्यूज चॅनेलला मुलाखत दिली. ज्या अदानींची सेबीकडून चौकशी सुरु आहे. या मुलाखतीत त्यांनी शेअर मार्केट ४ जून रोजी सर्व रेकॉर्ड तोडणार आहे. त्यामुळं रिटेल गुंतवणुकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटनं विक्रमी उच्चांक गाठला होता.

इथं मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली. त्यानंतर जेव्हा ४ जून रोजी निकाल जाहीर झाला तेव्हा शेअर बाजार धडामकनं खाली आपटला. यामुळं ३० लाख कोटी रुपयांचा तोटा झाला. यामध्ये रिटेल गुंतवणुकदारांचा मोठा तोटा झाला. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे.
जेपीसीद्वारे चौकशी व्हावी

त्यामुळं काँग्रेसची मागणी आहे की, भाजपकडून केले गेलेले फेक एक्झिट पोल आणि परदेशी गुंतवणुकादरांमध्ये काही संबंध आहे का? आणि का आहे? या संपूर्ण प्रकाराची संयुक्त संसदीय समितीद्वारे अर्थात जेपीसीद्वारे चौकशी झाली पाहिजे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.