Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुधेभावीजवळ गोवा बनावटीची दारू जप्त, दोघांना अटक कारसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

दुधेभावीजवळ गोवा बनावटीची दारू जप्त, दोघांना अटक कारसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्कची कारवाई


सांगली :  कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावीजवळ गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी कवठेमहांकाळ तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पंढरपूरच्या एकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या मिरजेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीची दारू, मोबाईल कार असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.  

रोहित आकाराम फोंडे (वय २४, रा. दुधेभावी), पृथ्वीराज काशिलिंग कोळेकर (वय २६, रा. आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर या दोघांसह अमोल करकमकर (रा. पंढरपूर) अशा तिघांविरोधात मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा बनावटीच्या दारूची एका मारूती कारमधून तस्करी होत असल्याची माहिती अधीक्षक पोटे यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यांनी मिरज कार्यालयाला कारवाईचे आदेश दिले होते. 

त्यानुसार बुधवारी सायंकाळी दुधेभावी परिसरात सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी एक कार (एमएच १० बीएम ५००४) संशयास्पदरित्या येताना दिसली. पथकाने ती अडवली. कारची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीची दारू सापडली. त्यानंतर दोघांना अटक करून दारू, मोबाईल, कार असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाने मिरजेचे निरीक्षक दीपक सुपे, दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, जितेंद्र पवार, शरद केंगार, संतोष बिराजदार, स्वप्नील आटपाडकर, कविता सुपने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.