Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शक्तिपीठ महामार्गाचा शासनाने फेरविचार करावा..आमदार गाडगीळ यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी: सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन पाठवण्याचे निर्देश

शक्तिपीठ महामार्गाचा शासनाने फेरविचार करावा..आमदार गाडगीळ यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी: सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन पाठवण्याचे निर्देश


सांगली,दि.१९ जून : सांगली विधानसभा मतदार संघातील अनेक गावातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे बागायती शेतीचे फार मोठे नुकसान होणार आहे.त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. तरी या महामार्गाचा फेरविचार करावा, अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन दिले. सविस्तर चर्चा केली.  मुख्यमंत्र्यांनी आमदार गाडगीळ यांच्या या मागणीचे पत्र(निवेदन) सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्तावित करावे असे निर्देश दिले. दरम्यान आमदार गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुंबईत भेट घेऊन त्यांना शक्तीपीठ महामार्गाचा फेरविचार करावा अशी विनंती केली. ना. फडणवीस यांनीही या विषयात तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन आमदार गाडगीळ यांना दिले.
आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणले की, सांगली विधानसभा मतदार संघातील अनेक गावातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील मौजे पदमाळे, कवलापूर, बिसूर, सांगलीवाडी, बुधगाव, खोतवाडी, कवलापूर इत्यादी गावातून हा महामार्ग जाणार आहे. या  महामार्गात  जाणाऱ्या या गावातील सर्व जमीन बागायती आणि पिकाऊ आहे. त्यामुळे या महामार्गामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. अनेक शेतकरी अल्पभूधारक किंवा भूमिहीन होण्याचाही धोका आहे. आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले की, प्रस्तावित महामार्गाच्या उंचीमुळे या गावांना महापुराचा फटका बसण्याचीही शक्यता आहे.

 या सर्व गावातील शेतकऱ्यांमध्ये या प्रस्तावित महामार्गामुळे फार मोठा असंतोष आहे. परिणामी शेतकरी फार मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या  गावातील शेतकऱ्यांनीच मला भेटून प्रस्तावित महामार्ग संदर्भातील आपली नाराजी आणि तीव्र विरोध व्यक्त केला आहे. तरी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृपया प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा शासनाने तातडीने पुनर्विचार फेरविचार करावा. अन्यथा शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.