मी महाविकास आघाडीचा उमेदवार होतो, यापुढे काँग्रेस पक्ष माझ्याबाबतीत काय निर्णय घेईल, त्या धोरणानुसार माझी पुढील वाटचाल असेल, असे मत काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे विजयाच्या जवळ गेलो आहे. मी महाविकास आघाडीचाच उमेदवार होतो, त्यामुळे माझ्या बाबतीत काँग्रेस पक्ष काय निर्णय घेईल त्याच्याशी मी बांधील असणार आहे. माझ्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी काम केले. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. अॅड प्रकाश आंबेडकर, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, जयश्री पाटील यांच्यासह अनिल बाबर यांचे कार्यकर्ते, विटा व मिरजेतील नगरसेवक यांच्यासह सर्वच पक्षाने माझ्यासाठी प्रयत्न केला आहे. त्याचे मी आभारी आहे..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.