Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लेक असावी अशी गुंड! तिने आई आणि भावालाच संपवले, कारण ऐकून बसेल धक्का

लेक असावी अशी गुंड! तिने आई आणि भावालाच संपवले, कारण ऐकून बसेल धक्का 


पोटच्या मुलीने आधी आईची हत्या केली, त्यानंतर भावाची हत्या, 24 तासात 'असा' लागला शोध हरियाणातील यमुनानगर येथील दुहेरी हत्याकांडाचा 24 तासांत उकल करून पोलिसांनी या हत्येतील तरुणीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलीने तिच्या चुलत भावाच्या मदतीने आधी तिच्या आईची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या भावाची हत्या केली. आरोपी तरुणीला आज कोर्टात हजर केले जाणार असून, पोलिस तीन दिवसांची कोठडी मागणार आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून हत्येमागील कारण शोधत आहेत. यासाठी पोलीस आरोपींची चौकशीही करत आहेत.

याप्रकरणी यमुनानगर शहर पोलिस स्टेशनचे एसएचओ जगदीश चंद्र यांनी सांगितले की, मुलीचा तिच्या आईसोबत काही कारणास्तव वाद झाला. या वादानंतर तिने चुलत भावाच्या मदतीने आईची हत्या केली. दरम्यान, तिचा सख्खा भाऊ घरी आला असता त्याने हा संपूर्ण प्रकार स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला. यानंतर मुलगी आणि तिच्या चुलत भावाने सख्खा भावाचीही हत्या केली. हत्या करताना चुलत भावाने तिच्या भावाच्या तोंडावर कपडा ठेवून त्याचा गळा आवळून खून केला आणि मुलीने सख्खा भावाचे दोन्ही पाय धरुन ठेवले होते. अशाप्रकारे पोटच्या मुलीने आईचा आणि सख्खा भावाची हत्या केली.
हत्येनंतर मुलीने स्वतः तक्रार दिली

स्वत:च्या आईची आणि भावाची हत्या केल्यानंतर मुलीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. एसएचओने सांगितले की, मुलीचा चुलत भाऊ आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले असून शोध सुरू आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात जाणार आहेत. त्याचवेळी मुलीला न्यायालयात हजर करून १५ दिवसांची मागणी करण्यात आली आहे. आता यात कोणते नवे खुलासे होणार आहे , हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अशाप्रकारे पोलिसांनी २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावला
यमुनानगर शहर पोलीस ठाण्याचे एसएचओ जगदीश चंद्र यांनी सांगितले की, मुलीच्या तक्रारीनंतर उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. यानंतर तक्रार करणाऱ्या तरुणीने सांगितलेल्या काही गोष्टी विचित्र वाटल्या. यानंतर संशयाच्या आधारे तिची चौकशी केली असता, तिने चुलत भावासह हत्येचा कट रचल्याचे सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.