Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोण कंगना? सुंदर आहे? अन्नू कपूरनें उडवली कंगनाची खिल्ली

कोण कंगना? सुंदर आहे? अन्नू कपूरनें उडवली कंगनाची खिल्ली 


मुंबई : कंगना रानौत आता अभिनेत्री असण्यासोबतच भाजपाची मंडीतील खासदार आहे. खासदार झाल्यापासून अभिनेत्री या ना त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिला विमानतळावर एका CISF महिलेनं थोबाडीत मारल्याचं प्रकरण आता जरा शांत झालं आहे.

कंगना खासदार झाली तेव्हा बॉलिवूडमधून खूप कमी लोकांनी तिचं अभिनंदन केलं. कंगनाचे विचार पटणारे आणि तिचे मित्र असणारे इंडस्ट्रीत खूप कमी लोक आहेत. अशातच आता एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यानं सगळ्यांसमोर कंगनाची खिल्ली उडवली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी प्रेस कॉन्फरंस दरम्यान कंगनाची खिल्ली उडवली आहे. हा अभिनेता सध्या 'हमारा बारह' या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशातच त्यांना कंगनाविषयी प्रश्न विचारताच त्यांनी तिची खिल्ली उडवली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
अन्नू कपूरने 'हमारा बारह'च्या प्रमोशनदरम्यान कंगना रणौतबद्दल बरंच काही म्हटलं आहे. त्यांनी कंगनासोबत घडलेल्या थप्पड कांडाविषयी भाष्य करत म्हटलंय की, 'कोण आहे ही कंगना, ती सुंदर आहे का?' मोठी अभिनेत्री आहे का?' अभिनेत्यानं कंगनाला ओळखण्यास नकार देताच उपस्थित एकानं 'ती नुकतीच खासदार झाली आहे' असं म्हटलं. हे ऐकून अन्नू कपूर म्हणाले, 'अरे ती पण आता खासदार झाली का?'

अन्नू कपूर पुढे म्हणाले, 'मी असं काही बोललो असेल तर सगळे अन्नू कपूर फालतू बोलतात असं म्हणतात. मग जर कोणी मला कानफाडीत मारली तर मी त्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतून जाईन.' असं म्हणत कंगनावर निशाणा साधला आहे. अन्नू कपूरच्या या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

अन्नू कपूर यांनी कंगनासोबतच 'हिरामंडी'चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावरही निशाणा साधला. संजय लीला भन्साळी यांना जोडे मारल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, 'त्यांचा धर्मावर विश्वास नाही. त्यांनी हिंदूंची चेष्टा केली आहे.' असं त्यांनी म्हटलं आहे.
अन्नू कपूर यांचा 'हमारे बारह' हा चित्रपट वादात सापडला आहे. हा चित्रपट 7 जूनला प्रदर्शित होणार होता पण वादात अडकल्यामुळे त्याची रिलीज डेट 14 जून निश्चित करण्यात आली होती. कोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळताच हा चित्रपट आज 21 जून रोजी प्रदर्शित होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.