पुण्यात चाललंय काय? पोलीस कर्मचाऱ्याचा अजब प्रताप, पोलिसांनी तरुणाकडून स्वत:चे पाय दाबून घेतले पुण्यातील कल्याणीनगर भागातून काल मध्यरात्रीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा अजब प्रताप पाहायला मिळत आहे. पुणे पोलिसांनी एका तरुणाकडून स्वत:चे पाय दाबून घेतल्याचे प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात नाकाबंदीच्या ड्युटीवर असताना एका पोलिसाने चक्क एका तरूणाला आपले पाय दाबून द्यायला सांगितले.पोलिसाच्या या कृतीमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कल्याणीनगर परिसरातून काही तरूण आपल्या बाईकवरून जात असताना नाकाबंदीच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसाने त्यांना अडवलं आणि स्वतःचे पाय चेपून देण्यास सांगितले. मात्र पोलीस प्रशासनाकडून याबाबत कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. बघा हा व्हायरल होणारा व्हिडीओ
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.