घरातील मनी प्लांटमध्ये बांधा फक्त 'ही' एक गोष्ट! होईल पैसाच पैसा, येईल सुखसमृद्धी
आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात अशा काही वनस्पती किंवा वृक्ष नक्कीच असतात, जे आपल्याला ताजी हवा देतात आणि वातावरणसुद्धा शुद्ध ठेवतात. झाडेदेखील आपल्या घराचे सौंदर्य वाढवतात. त्यामुळे अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुंदर झाडे लावली जातात. काही झाडे शोभेची असतात. तर काही फळझाडे असतात. यामध्ये प्रत्येक घरात आणखी एका प्रकारचे रोप आवर्जून पाहायला मिळते. ते रोप म्हणजे मनी प्लांट होय. आपल्या घरात पैसा यावा तो टिकावा. आणि सुखसमृद्धी नांदावी यासाठी हे रोपटे आपल्या घरात लावले जाते. परंतु अनेकांना मनी प्लांट लावण्याबाबत बऱ्याचशा गोष्टी माहितीच नाहीत. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
ज्योतिषशास्त्रानुसार, मनी प्लांट घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. शिवाय घरात पैसा आकर्षीत होण्यास मदत होते. धनसंपत्तीत अधिक वाढ होते. आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने घरातील वातावरणसुद्धा आनंदी राहते. एकंदरीत घरात सुखसमृद्धी येते. त्यामुळे अनेकजण घरात मनी प्लांट लावण्याचा सल्ला देतात. परंतु मनी प्लांट लावण्याच्या काही पद्धती आणि नियम आहेत. त्या ज्योतिषीय नियमांनुसार त्याच दिशेला, त्याच ठिकणी मनी प्लांट लावण्याने घरात भरभराटी होते. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार अशी एक गोष्ट आहे जी मनी प्लांटला बांधल्यास घरात पैसे आकर्षित होण्यास जास्त मदत होते.
मनी प्लांटमध्ये आवर्जून बांधा 'ही' गोष्ट
तुमच्याही घरात मनी प्लांट असेल तर तुम्हालाही या ज्योतिषीय गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे. शास्त्रानुसार घरातील मनी प्लांटमध्ये लाल रंगाचा कलावा किंवा लाल धागा बांधने अत्यंत शुभ समजले जाते. देवी लक्ष्मीला समर्पित असलेल्या शुक्रवारच्या दिवशी मनी प्लांटच्या खोडाजवळ लाल धागा बांधने उत्तम असते. असे केल्याने लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न होते. आणि घरात धनसंपत्ती, सुखसमृद्धी आणि उत्साह येतो.
मनी प्लांटमध्ये कसा बांधावा लाल धागा(लाल कलावा)
वास्तू शास्त्रानुसार मनी प्लांटमध्ये लाल धागा बांधण्यापूर्वी ही प्रक्रिया शुद्धरीत्या करणे आवश्यक आहे. त्यासाठी शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यांनंतर देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. आणि देवीच्या चरणात तो लाल धागा अर्पण करावा. धूप कापूर जाळून पूजा पूर्ण करावी. त्यांनंतर लक्ष्मी देवीचा जप करत तो धागा मनी प्लांटच्या खोडाशी बांधून दयावा. काही दिवसांतच तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळतील.
घरात कोणत्या दिशेला मनी प्लांट ठेवणे योग्य?
ज्योतिषीय अभ्यासात वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला मनी प्लांट ठेवल्यास ते धन आकर्षित करते. शिवाय उत्तर दिशेला ठेवल्याने आर्थिक स्थैर्य येते आणि मिळकतीत वृद्धीही होते. तसेच घरामध्ये जर दोन मनी प्लांट एकत्र ठेवायचे असतील तर आग्नेय कोपरा यासाठी शुभ मानला जातो. मात्र उत्तर किंवा पूर्व दिशेला मनी प्लांट ठेवणे टाळावे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.