Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस दलात हळहळ..! भरधाव डंपरच्या धडकेत पोलीस कॉन्स्टेबलसह महिलेचा जागीच मृत्यू

पोलीस दलात हळहळ..! भरधाव डंपरच्या धडकेत पोलीस कॉन्स्टेबलसह महिलेचा जागीच मृत्यू 


ठाणे : नवीन घराच्या रजिस्ट्रेशनच्या कामासाठी मोटारसायकलवरून निघालेल्या पोलीस हवालदारासह एका महिलेचा डंपरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी १२ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ठाण्यातल्या वर्तकनगरमधील कोसर भागामध्ये घडली.

सुनिल रावते (वय-45, रा. सावरकरनगर, ठाणे) आणि मिमा रामपूरकर (वय-40, रा. विटावा, ठाणे) असे दोघा मृतांची नावे आहेत. मयत सुनील रावते हे ठाणे क्राईम ब्रांचच्या वागळे युनिटमध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रावते हे वागळे स्टेट परिसरातील सावरकरनगर भागात राहत होते. ते ठाणे शहर पोलिस दलात क्राईम ब्रांचच्या वागळे युनिटमध्ये कार्यरत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी वसंतविहार परिसरात नवीन घर खरेदी केले होते. याच घराच्या रजिस्ट्रेशनसाठी ते बुधवारी सकाळी निबंधक कार्यालयात सहाय्य करणाऱ्या मिमा रामपूरकर या महिलेसह त्यांच्या मोटारसायकलीवरुन जात होते.

त्याचवेळी साडे अकराच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलला भरघाव वेगाने आलेल्या एका डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात रावते आणि त्यांच्या सोबत असलेली महिला दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, डंपर चालकाविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावते यांच्या मागे पत्नी, 17 वर्षांचा मुलगा आणि 10 वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.