Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! वैष्णवीदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यानी केला हल्ला :, 10 भाविकांचा मृत्यू

Big Breaking! वैष्णवीदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यानी केला हल्ला :, 10 भाविकांचा मृत्यू 


जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारानंतर बस एका खोल दरीत कोसळली असून हल्ल्यात बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वैष्णोदेवीपासून ८० किलोमीटर अंतरावर शिवखोरी हे धार्मिक स्थळ आहे. या भागात शंकर मंदिर असून देशभरातील भाविक या धार्मिक स्थळाला भेट देतात. रविवारी संध्याकाळी खासगी बसमधून भाविक देवदर्शन करून परतत होते. कटराच्या दिशेने ही बस जात होती. रियासी जिल्ह्यातील चंडी मोडजवळ या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात बसचालक गंभीर जखमी झाल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली.

स्थानिकांच्या माहितीनुसार, संशयित दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. ज्या भाागात हा हल्ला झाला तो परिसर राजौरी आणि रियासी जिल्ह्याच्या सीमेवर आहे. सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. एकीकडे मदतकार्य सुरू असून दुसरीकडे दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम देखील सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.