Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानात सापडला 8 किलो 'गांजा'

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानात सापडला 8 किलो 'गांजा'

नुकताच पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एफसी रोडवरील एका हॉटेलमधील काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात या पार्टीमध्ये काही तरुण चक्क बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना दिसून येत आहे. हे प्रकरण ताजे असतांनाच आता नाशिकमधून गांजाचा मोठा साठा सापडला आहे. हा गांजाचा साठा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानात सापडल्याची माहिती समोर येत आहे.

मिळलेल्या माहितीनुसार,’शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानात आठ किलो गांजा सापडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या नांदगाव तालुका प्रमुखाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाप्रमुखांनी आरोप तालुकाप्रमुखावर राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, या कारवाईचा ठाकरे गटानं निषेध केला आहे. याप्रकरणी उबाठाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. शिवसेना नेत्यावर खोटी कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज नांदगाव, मनमाड शहर बंद राहणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.