देशातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर, पडताळणीत 80 टक्के रुग्णालये नापास
देशातील सरकारी रुग्णालयांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलंय. त्यामध्ये 80 टक्के सरकारी रुग्णालये नापास झाली आहेत. कुठे पुरेशी औषधे नाहीत, तर कुठे बेड्स, आरोग्य कर्मचारी नाहीत, अशी चिंताजनक बाब समोर आलीय.
2007 आणि 2022 मध्ये सार्वजनिक स्वास्थ्य मानकांच्या आधारे सरकारने देशभरातील सरकारी रुग्णालयांची पडताळणी केली. त्यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील 40451 रुग्णालये निवडली. त्यापैकी 32362 रुग्णालयांना 100 पैकी 80 हून कमी गुण मिळाले. 17190 रुग्णालयांना तर 50 पेक्षा कमी अंक मिळाले.
फक्त 8089 रुग्णालयांना 80 पेक्षा जास्त गुण मिळून हेल्थ स्टॅण्डर्ड राखता आलाय. प्रत्येक सरकारी रुग्णालयाचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आलंय. प्रत्येक रुग्णालयाला 80 टक्के गुण पाहिजेत. यामध्ये राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी 25 गुण, रुग्णांच्या प्रतिक्रियांवर 5 गुण, आरोग्य सेवांसाठी 10 गुण, लॅबोरेटरी सुविधा 5 गुण, औषधसाठय़ासाठी 10 गुण दिले जातात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.