समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जालन्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. यात सात जणांचा जागी मृत्यू झाली. नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कारला डिझेल भरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. स्विफ्ट कारणे धडक दिल्यानंतर ईरटीका कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून खाली गेल्याची माहिती समोर येत आहे.
रात्री अकराच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार क्रं. MH.12.MF.1856 मध्ये डिझेल भरल्यानंतर विरुद्ध दिशेने नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीका कार क्रं. MH.47.BP .5478 ला जोरदार धडक दिली. कडवंची गावाजवळ हा अपघात घडला असून, यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.