भारतातील या 5 खतरनाक लेडी डॉन, यातील कुणी घातली नेहरू यांना लग्नाची मागणी तर कोणी केलं 21 ठाकुरानां ठार
बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये डॉन किंवा गँगस्टर हे सहसा पुरुष म्हणून दाखवले जातात. परंतु, वास्तविक जीवनात अंडरवर्ल्ड डॉन हे केवळ पुरुषच नाहीत तर यात अनेक महिलांचाही समावेश आहे. काही काळी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदल घेण्यासाठी या महिला गुंडगिरी किंवा माफिया टोळ्यांच्या गराड्यात घुसल्या. अशा अनेक भारतीय स्त्रियांची इतिहासाने काळी नोंद ठेवली आहे. ती त्यांच्या निर्दोषतेसाठी नव्हे तर भयंकर आणि अत्यंत धोकादायक म्हणून. यातील काही जणी स्वतःवर झालेल्या अत्याचार, अन्यायाविरोधात पेटून उठल्या.
त्यामुळेच त्या या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्या. त्याचे समर्थन करता येणार नाही. पण, त्यांना गुन्हेगारी क्षेत्रात का यावेसे वाटले? काय होती त्यामागची कहाणी? त्या लेडी डॉन आणि लेडी गँगस्टर्स ऑफ इंडिया यांना सामान्य जनताच नाही तर पोलीस दलातील अनेक बडे अधिकारीही घाबरून असायचे. त्या महिलांच्या नावाचा दराराच असा होता की अनेक जण त्यांना टरकून असायचे. देशातल्या सर्वात 5 खतरनाक लेडी डॉन याची माहिती या लेखात देत आहोत. यातील एका लेडी डॉन हिने तर देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना थेट लग्न कराल का? अशी विचारणा केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.