पुणे : देहूगाव येथील जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौलत मधुकर गायकवाड (वय ३५ वर्षे, भू करमापक भूमी अभिलेख कार्यालय, हवेली, येरवडा, पुणे.), योगेश्वर राजेंद्र मारणे (वय २५ वर्षे , रा एरंडवणे ,पुणे) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ १२ अन्वये येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीन मोजण्यासाठी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी दौलत गायकवाड यांच्या सांगण्यावरून योगेश्वर मारणे ४ लाख रुपयांमधील ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे. याबाबतचा अधिक तपास ला. प्र. वि पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे ला. प्र. वि पुणे. यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.