कोल्हापूर : देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कोल्हापूरमधून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यात एका महिलेसोबत चार जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले.
ही धक्कादायक घटना यळगुड येथून समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्या असून प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या चौघांनीही धमकी देत महिलेवर अत्याचार केला होता. त्यांनी महिलेची माहिती एकमेकांना दिली. यानंतर तिला धमकी देत चौघांनीही तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले. या प्रकरणात तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्याचं समोर आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.