आपण आंघोळ नीट करत आहोत असे आपल्याला वाटते पण तसे नसस्ते, कारण शरीराच्या काही भागांकडे आपले लक्च जात नाही किंवा त्यांची स्वच्छता करण्याचा विचारही येत नाही. बहुतांश लोकं नियमित आंघोळ करतात, सकाळची सुरुवात ताजी आणि आरोग्यदायी व्हावी यासाठी स्नान खूप आवश्यक आहे.
मात्र, कामात वेळेत पोहोचण्यासाठी लोकं खूप घाई गडबड करतात, ज्यामुळे पटकन आंघोळ आटोपली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? असे सतत केल्याने शरीरातील काही भाग अस्वच्छच राहतात, कालांतराने वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे रोज नीटनेटकी आंघोळ करणे शक्य जरी नसले तरी, नियमित शरीराचे तीन दुर्लक्षित केले जाणारे भाग धुणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात, असे कोणते भाग आहेत जे योग्यप्रकारे धुतले जात नाही.
व्यवस्थित आंघोळ केली नाही तर काय होते?
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, संशोधकांनी दररोज आंघोळ करण्याबाबत केलेल्या दाव्यामध्ये असे म्हंटले आहे की, अंघोळ करताना शरीरातील ओलसर आणि तेलकट भाग रोज स्वच्छ केले जात नाहीत. ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. जसे की, एक्जिमा, पुरळ, खाज सुटणे, कोरडेपणा ई.या सर्वांशिवाय त्वचेशी संबंधित अनेक समस्याही उद्भवू शकतात. संशोधनानुसार, जर एखाद्या व्यक्तीने शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर त्याच्या शरीरात संसर्गजन्य जीवाणू तयार होतात आणि ते त्वचेशी संबंधित अनेक समस्या वाढवतात. त्यामुळे आज आपण या महत्वपूर्ण गोष्टींची माहिती घेऊया.आंघोळ करताना शरीराचे हे भाग नियमित करा स्वच्छ अनेक लोकांना कामाच्या व्यापात चांगली आंघोळ करायला जमत नाही. परिणामी अशी लोकं आजारी पडतात, त्यामुळे अशा लोकांनी किमान शरीराचे हे तीन भाग धुवून जरी काढले तरी अनेक् फायदा होऊ शकतो. जाणून घ्या कोणते आहेत ते 3 अवयव.
कानांच्या मागची बाजू
आंघोळ करताना बहुतांश लोकं कानाच्या मागच्या बाजूकडे दुर्लक्ष करत. ज्यामुळे कानामागे येणारा घाम तिथे साचत राहतो. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कानामागे घाम आणि मृत त्वचेच्या पेशी जमा झाल्यामुळे खाज येण्यासारखी समस्या उद्भवू शकते. म्हणून, दररोज आंघोळ करताना, वॉशक्लोथच्या साहाय्याने कानांच्या मागे स्वच्छ करा. यासाठी तुम्ही ओला टॉवेल देखील वापरू शकता.
बोटांच्या दरम्याची जागा
अनेकदा आपण आपले पाय आणि टाच व्यवस्थित स्वच्छ करतो पण पायाच्या बोटांकडे लक्ष देत नाही. पायाची बोटे आणि त्यांच्या दरम्यान साचलेली घाण आवर्जून साफ करणे गरजेचे आहे. कारण तसे केले नाही तर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे आंघोळ करताना पायाची बोटं देखील साफ करा, आणि आंघोळ झाल्यानंतर ती चांगल्या कोरड्या टॉवेलने सुकी करा.
बेंबीची स्वच्छता
आंघोळ करताना बऱ्याचडा खांद्यावर, पोटावर पाणी घेतले जाते. पण कधी बेंबी तुम्ही स्वच्छ करता का? जर नसेल तर आजपासून स्वच्छ करणे सुरू करा, कारण नियमित बेंबी धुणे देखील खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही असे केले नाही तर त्यामध्ये घाण साचू लागते आणि त्यामुळे त्वचेच्या मृत पेशींसह त्वचेशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. बेंबी दररोज स्वच्छ केली गेली नाही तर, बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. तुम्हाला हवे असल्यास रोज झोपण्यापूर्वी बेंबीला तेल देखील लावू शकता. यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक फायदे मिळतील. तर या तीन गोष्टी व्यवस्थित स्वच्छ करायला अजिबात विसरू नका, अगदी कामाला जाण्यास कितीही घाई असली तरी शरीराचे तीन अंग दररोज साफ करणे गरजेचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.