आज देशभरातील अनेक महिला व्यवसाय क्षेत्रात घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. तर काही महिला आजही व्यवसाय करण्याची इच्छा उराशी बाळगून आहेत. मात्र, विविध अडीअडचणींमुळे त्यांना व्यवसाय क्षेत्रात उतरणे शक्य होत नाहीये.
अशा महिलांसाठी केंद्र सरकार कायम वेगवेगळ्या योजना राबवत असते. ज्यांपैकी एक म्हणजे उद्योगिनी योजना. महिलांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा, त्यांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बिनव्याजी ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. आज आपण याच योजनेची पूर्ण माहिती घेणार आहोत.
उद्योगिनी योजना
आजपर्यंत केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. आत्मनिर्भर भारत अंतर्गत कितीतरी योजना सुरु आहेत. ज्या महिलांना त्यांच्या उद्योग व्यवसायात मदत करतात. तसेच महिलांच्या व्यवसायासाठी भांडवल उभारणीकरता केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार महिला उद्योग निधी योजना मुद्रा योजना, भारतीय महिला व्यावसाय बँक कर्ज योजना, अन्नपूर्ण योजना, स्त्रीशक्ती पॅकेज अशा कितीतरी योजना सक्रिय आहेत. यांपैकीच एक म्हणजे उद्योगिनी योजना.
किती कर्ज मिळेल?
महिलांना आर्थिक दृश्य सबळ करण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सक्रिय आहे. महिलांना त्यांच्या उद्योग, व्यवसायासाठी ही योजना ३ ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. या योजनेच्या पूर्ण माहितीसाठी अर्जदार महिलेने आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेला भेट देणे आवश्यक आहे. निकष तपासून या योजनेसाठी अर्ज केला असता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग महिलांना बिनव्याजी कर्ज, तर इतर महिलांना अल्पदरात कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्याचा महिला उद्योजकांना लाभ होतो.
ही योजना कोणत्या व्यवसायासाठी कर्ज देते?
माहितीनुसार, उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून केवळ महिलांना उद्योग- व्यवसायांसाठी कर्ज दिले जाते. ज्यामध्ये चहा - कॉफी पावडर व्यवसाय, रोपवाटिका, बांगडी निर्मिती, बेडशीट, टॉवेल निर्मिती, ब्युटीपार्लर, वही कारखाना, मसाला उद्योग, कापूस धागा उत्पादन, कापड, दुग्ध व्यवसाय आदी व्यवसायांसाठी कर्ज दिले जाते.
लाभार्थी कोण?
शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाचे निकष लक्षात घ्यावे लागतील. जसे की, या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक महिला लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखांपेक्षा कमी असावे. तरच या योजनेचा लाभ मिळेल. याशिवाय अर्ज करणाऱ्या महिलेचे वय १८ ते ४५ मध्ये असावे. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलेला शासनाकडून कर्जात ३० टक्के अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.