Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय शेअर बाजार सलग 3 दिवस बंद राहणार, एकही शेअर खरेदी - विक्री करता येणार नाही

भारतीय शेअर बाजार सलग 3 दिवस बंद राहणार, एकही शेअर खरेदी - विक्री करता येणार नाही 


गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गुंतवणुकदारांच्या संख्येत वाढ झालेली असतानाच भारतीय बाजारात मोठी तेजी सुद्धा पहायला मिळत आहे.

भारतीय शेअर बाजाराच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही बीएसई (BSE) किंवा एनएसई (NSE) मध्ये शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण, आता तीन दिवस तुम्हाला शेअर्सची खरेदी-विक्री करता येणआर नाहीये. म्हणजेच भारतीय शेअर बाजार सलग तीन दिवस बंद राहणार आहे. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण आणि कधीपासून कधीपर्यंत शेअर बाजार बंद राहणार आहे.

तीन दिवस शेअर बाजाराचे व्यवहार बंद
15 जून आणि 16 जून रोजी शनिवार-रविवार आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी नियमितपणे शेअर बाजारात व्यवहार होणार नाहीयेत. पण त्यासोबतच सोमवारी म्हणजेच 17 जून रोजी सुद्धा शेअर बाजारात शेअर्सची खरेदी-विक्री करणे शक्य होणार नाहीये. कारण, 17 जून रोजी शेअर बाजार बंद राहणार आहे. 17 जून रोजी बकरी ईद असल्याने शेअर बाजार बंद राहणार आहे. म्हणजेच 15 जून, 16 जून आणि 17 जून असे एकूण तीन दिवस शेअर बाजाराचे व्यवहार बंद राहणार आहेत.
2024 या वर्षात स्टॉक मार्केटच्या सुट्ट्यांच्या लिस्टनुसार, 17 जून रोजी बकरी ईदच्या निमित्ताने कमोडिटी, डेरिवेटिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) सेगमेंटमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ट्रेडिंग बंद राहणार आहे. पण, एमसीएक्स MCX वर संध्याकाळच्या सेशनसाठी ट्रेडिंग सुरू राहणार आहे. संध्याकाळी 5 नंतर कमोडिटी डेरिवेटिव्ह सेगमेंट आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) सेगमेंटमध्ये ट्रेडिंग सुरू असेल.

2024 वर्षातील बीएसईच्या सुट्ट्यांची यादी (BSE Holiday List)
सुट्टी दिनांक वार
बकरी ईद 17 जून 2024 सोमवार
मुहर्रम 17 जुलै 2024 बुधवार
स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2024 गुरुवार
महत्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2024 बुधवार
दिवाळी (लक्ष्मीपूजन) 1 नोव्हेंबर 2024 शुक्रवार
गुरूनानक जयंती 15 नोव्हेंबर 2024 शुक्रवार
ख्रिसमस 25 डिसेंबर 2024 बुधवार
त्यामुळे तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा शेअर्सची खरेदी - विक्री करत असल्याचा विचार करत असाल तर सुट्ट्यांची यादी पाहूनच व्यवस्थित नियोजन करा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.