गायब झालेली महिला; 3 दिवसांनी अजगराच्या पोटात अशा अवस्थेत सापडली की सगळेच हादरले
नवी दिल्ली : एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एक बेपत्ता महिला चक्क अजगराच्या पोटात सापडली. ही धक्कादायक घटना इंडोनेशियामधून समोर आली आहे. ज्यात 45 वर्षीय महिला अजगराच्या पोटात मृतावस्थेत आढळली. दक्षिण सुलावेसी प्रांतातील कलेमपांग गावातील फरीदा शुक्रवारी 7 जून रोजी बेपत्ता झाली होती. ती घरी न परतल्याने पती आणि कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला.
शोध घेत असताना फरीदाच्या काही वस्तू तिच्या पतीला जंगलात सापडल्या. त्यामुळे गावकऱ्यांना संशय आला, की जवळपासच 16 फूट लांबीचा एक मोठा अजगर आहे. या भयानक शोधाचं वर्णन करताना, गावचे प्रमुख सुआर्डी रॉसी यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितलं की, त्यांना काहीच वेळात एक पोट फुगलेला अजगर दिसला. त्यानंतर गावकऱ्यांचा संशय आणखीच बळावला.
गावकऱ्यांनी अजगराला पकडून त्याचं पोट कापण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हे करताच फरीदाचं डोकं लगेच दिसू लागलं. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये घबराट पसरली. अजगराचं संपूर्ण पोट फाडल्यानंतर फरीदाचं संपूर्ण शरीर दिसलं. फरीदा हिला अजगराने गिळलं होतं, अजगराच्या पोटात तिचा मृतदेह कपड्यांसह आढळून आला.
अजगराने मानवाला गिळण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी आग्नेय सुलावेसीच्या तिनंगगिया जिल्ह्यातही अशीच घटना घडली होती. ज्यामध्ये अजगराने एका शेतकऱ्याला खाल्लं होतं. 2022 मध्ये, जाहरा नावाच्या 50 वर्षीय रबर-टॅपर महिलेसोबतही असंच घडलं. स्थानिक वृत्तानुसार, फळबागेत काम करून परतणाऱ्या गावकऱ्यांनी जाहराचा मृतदेह अजगराच्या पोटात पाहिला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.