पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने 36 लाखांना लुटले, भोंदू महाराजाला अटक
पैशांचा पाऊस पाडून कोटय़वधी रुपये देतो, कीज पडलेले काश्याचं भांडं कंपनीला देऊन कोटय़कधी रुपये मिळतील, असे सांगून वेळोवेळी तब्बल 36 लाख रुपये घेऊन एकाची फसवणूक केल्याप्रकरणी कपडे भकानवाडी (ता. पोलादपूर) येथील भोंदू महाराजाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली.
पंढरीनाथ गणपती पवार ऊर्फ काका महाराज असे त्या अटक केलेल्या भोंदू महाराजाचे नाव आहे. अमित श्रीरंग शिंदे (वय 42, रा. नाडे, ता. पाटण, सध्या रा. रविवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना 2021 ते 2023 या कालावधीत वेळोवेळी घडली आहे.
अमित शिंदे शेतकरी आहेत. ऊसतोड टोळी आणण्यासाठी ते 2021 मध्ये पोलादपूर येथे गेले होते. तेथे पंढरीनाथ पकार ऊर्फ काका महाराज याच्यासोबत त्यांची ओळख झाली. त्यानंतर काका महाराजाने हातकणंगले येथील एका माणसाकडे कीज पडलेले काश्याचं भांडं आहे. त्याचा वापर मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये केला जातो. कंपनी अशा भांडय़ासाठी 500 ते 1000 कोटी रुपये देते. ते भांडे घेण्यासाठी लाखो रुपये लागतील. तू ते पैसे दिले तर ते विकून त्यातून पैसे मिळतील, असे भोंदू महाराजाने सांगितले. त्याकेळी अमित यांनी पैसे नसल्याचे सांगितले. या घटनेनंतर काका महाराज आणि अमित यांच्यात वारंवार फोनवर बोलणे होत होते.
काश्याच्या भांडय़ाला गिऱहाईक आल्याचे सांगून भोंदू महाराज तक्रारदारांच्या साताऱयातील घरी आला होता. तेक्हा त्या काश्याच्या भांडय़ावर आलेले जेलीचे आवरण काढण्यासाठी एक विशिष्ट कोट लागतो. तो कोट कंपनीचे लोक भाडय़ाने घेऊन येतात. आवरण काढल्यानंतर कंपनीचे लोक लगेच 50 कोटी रुपये देतील, असे आमिष दाखवले. त्या कोटचे भाडे व कंपनीचे लोक बोलवण्यासाठी 14 लाख रुपये लागतात, असे सांगून भोंदूबाबाने पुन्हा पैसे मागितले. यामुळे अमित यांचा भोंदूबाबावर विश्वास बसला व त्यांनी 4 लाख रुपये रोख दिले. त्यानंतर भोंदूबाबाने 5 केळा हातकणंगले, पन्हाळा येथे अघोरी पूजा व जोदूटोणा एकांतात करावा लागेल, असे सांगून वेळोवेळी एकूण 28 लाख रुपये रोख व ऑनलाइन स्वरूपात घेतले. पैसे लवकरच मिळतील, अशी अपेक्षा असताना भोंदूबाबा प्रत्येकवेळी ते भांडं गरम झालं आहे. भांडय़ावर साप आले आहेत. शेवटच्या वेळी भांडं गरम होऊन ते भांडं जळाले असल्याचे सांगितले.
यामुळे अमित शिंदे यांनी भोंदूबाबाकडे नोक्हेंबर 2022 पासून 28 लाख रुपये परत करण्यासाठी तगादा लाकला. जानेवारी 2023 मध्ये काका महाराजाने अमित यांना जुन्या गोल नाण्याकर जादूटोणा करून एक केमिकल टाकलं की त्याचे आर. पी. क्वॉईन तयार होतात. त्या क्वॉईनची कंपन्यांना गरज असते व त्यातून चांगले पैसे मिळतील. ते पैसे मिळाले की सर्व पैसे परत करतो, असे सांगितले. या क्वॉईनसाठी 4 लाख रुपयांचा खर्च असल्याचे सांगून पुन्हा पैसे घेतले. महाराजाने काळी बाहुली, मंत्र, लिंबू, अंगारे, हळदी-कुंकू याचा वापर करून जादूटोणा क्वॉईन तयार केले. मात्र, कंपनीने ते क्वॉईन घेतले नसल्याचे सांगितले. काका महाराजाने वेळोवेळी 36 लाख रुपये घेऊन फसकणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमित यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तपासासाठी गुन्हे प्रकटीकरण विभागाला सांगितले. या पथकाने भोंदू महाराजाला अटक केली आहे. या कारवाईत फौजदार सुधीर मोरे, पोलीस नीलेश यादव, सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, सागर गायककाड यांनी सहभाग घेतला.
सातारा, कोल्हापूर, रायगड जिह्यांत गुन्हे
भोंदू महाराजावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या घटनेची व्याप्ती मोठी असल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर, सातारा व रायगड जिह्यांत आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. तसेच जादूटोणा करण्यासाठी या तिन्ही जिह्यांत भोंदूबाबा फिरल्याचे समोर येत आहे. याबाबत कोणाची फसवणूक झाली असेल, तर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दाभोलकरांच्या जिह्यात अंधश्रद्धा
अंधश्रद्धेविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपले जीवन पणाला लावले. अंधश्रद्धेविरुद्ध कायदा अस्तित्वात यावा, अशी मागणी असतानाच, धर्मकेडय़ांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या. नुकतेच गोळय़ा झाडणाऱयांना शिक्षा झाली आहे. दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने कायदा अस्तित्वात आणला. दुर्दैवाने मात्र सातारा जिह्यात सर्रास अंधश्रद्धेतून फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे वास्तक आहे. दरम्यान, अंधश्रद्धेतूनच खून, आत्महत्या घडत असल्याचे वारंवार समोर येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.