लखनऊ : एका नवरीचा असा कारनामा समोर आला आहे, ज्याबद्दल ऐकून सगळेच हैराण झाले. नवरीने दोन राज्यांमध्ये खळबळ उडवून दिली. एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेली ही तरुणी दोन राज्यांमध्ये जवळपास 5 नवरदेवांसोबत लग्न करून एक रात्र घालवून आली आहे.
तिने उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवलं. उत्तराखंडमधील उधम सिंग नगर येथील रहिवासी असलेल्या एका मुलीने तिच्या टोळीसह पश्चिम उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत कट रचून 1 मार्च रोजी मंदिरात लग्न केलं. दुसऱ्याच दिवशी लुटेरी नवरी घरातील सर्व सामान घेऊन पळून गेली. या घटनेनंतर पीडित वराने मुझफ्फरनगरमधील तितावी पोलीस ठाण्यात वधू आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत नवरीसह या टोळीतील 7 जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून दागिनेही जप्त केले.
पोलिसांनी चौकशीअंती संपूर्ण टोळीची 6 मे रोजी कारागृहात रवानगी केली. मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगात गेल्यानंतर या नवरीने मेडिकल दरम्यान स्वत:ला एचआयव्ही पॉझिटिव्ह सांगून जेल प्रशासनाला धक्का दिला. जिल्हा आरोग्य विभागाने या नवरीची एचआयव्ही चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आढळून आली. आता जिल्ह्याच्या आरोग्य विभागानेही या नवरीने ज्यांच्याशी लग्न केलं होतं, त्यांचा शोध सुरू केला आहे. सध्या ही नवरी तिच्या टोळीसह मुझफ्फरनगर कारागृहात बंद आहे.याबाबत माहिती देताना मुझफ्फरनगर जिल्हा कारागृह अधीक्षक सीताराम शर्मा यांनी सांगितलं की, तिच्यावर प्रोटोकॉलनुसार उपचार सुरू आहेत. ती महिला कारागृहात आल्यावर आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तिच्यावर आधीच उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.