नवी दिल्ली: भारतामध्ये हिंदू धर्माच्या लोकांमध्ये एकदाच लग्न केले जाते. एकाच वेळी दोन लग्न केले असल्यास एखाद्याला तुरुंगात देखील जावं लागतं. अनेक देशांमध्ये अशा प्रकारचीच तरतूद आहे. पण, जगात असाच एक देश आहे, जिथे दोन लग्न करावे लागतात. विशेष म्हणजे दोनवेळा लग्न केलं नाही तर व्यक्तीला तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो.
आफ्रिकेमध्ये इरीट्रिया नावाचा छोटा देश आहे. याठिकाणी पुरुषांना दोन लग्न करणे अनिवार्य आहे. दोन लग्न केले नाही तर पुरुषाला तुरुंगामध्ये डांबण्यात येतं. इतकंच नाही तर लग्नासंबंधीची ही अट कायद्यामध्ये देखील सांगण्यात आली आहे. त्यामुळे इरीट्रियामध्ये प्रत्येक पुरुषाला दोनवेळा लग्न करावे लागते. कायद्यातच तरतूद असल्याने इथे महिला आपल्या पतीला दुसरे लग्न करण्यापासून रोखू शकत नाही. महिलेने पतीला दुसरे लग्न करण्यापासून ऱोखलं तर तिला देखील तुरुंगात जावं लागू शकतं.
देशामध्ये का आहे असा कायदा?
पुरुषाला दोन लग्न करणे अनिवार्य करण्यामागे काय कारण असावं असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. इरीट्रिया देशामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या खूप जास्त आहे. इरीट्रिया देशाची लोकसंख्या जवळपास ३८ लाख आहे. त्यात जवळपास ५१ टक्के महिला आहेत, तर ४९ टक्के संख्या पुरुषांची आहे. शिवाय, पुरुषाने दोन लग्न करणे हे धर्माशी संबंधित आहे.इरीट्रिया जगातील गरीब देशांपैकी एक आहे. खूप काळापासून एकच शासन, पायाभूत सुविधांचा अभाव, डबगाईला आलेली अर्थव्यवस्था, अपुरे कायदे इत्यादीमुळे देशाची अशी परिस्थिती झाल्याचं सांगितलं जातं. शासनाचे लोकांवर नियंत्रण नसल्याने गुन्हेगारीचे प्रमाण देखील मोठे आहे. एकंदरीत देशाची स्थिती वाईट आहे. दरम्यान, १० लाख वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष या देशामध्ये सापडले आहेत. त्यामुळे याठिकाणी मानवाची उत्क्रांती होत होती असं सांगितलं जातं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.