Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिरढोण येथे अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार :, 2 जखमी

शिरढोण येथे अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार :, 2 जखमी 



शिरढोण (ता.शिरोळ) येथे गुलमोहर हॉटेलजवळ टेम्पोला ओव्हरटेक करताना दोन दुचाकींची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (दि.२३) सकाळी ११ च्या सुमारास झाला. सलिम समशेर इचलकरंजे (वय ४९, रा. आलास, ता. शिरोळ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर साहेरा सलीम इचलकरंजे, फारूक कादर शेख (रा. इचलकरंजी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सलिम इचलकरंजे हा दुचाकीवरून (एम.एच.09 इ.जे 7788) वरून इचलकरंजीकडे पत्नी साहेरा इचलकरंजे यांना घेऊन जात होते. तर फारूक शेख हा आपल्या दुचाकीवरून (एम.एच.09, सी. वाय 7090) इचलजरंजीहून कुरुंदवाडकडे जात होते. यावेळी गुलमोहर हॉटेलजवळ इचलकरंजे हा टेम्पोला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या शेख यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने इचलकरंजे यांचे जमिनीवर डोके आपटल्याने ते जागीच ठार झाले. तर पत्नी साहेरा आणि शेख हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.