Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बापरे.... तब्बल 17 कोटींचं आहे हे इंजेक्शन, जाणून घ्या इतके महाग का?

बापरे.... तब्बल 17 कोटींचं आहे हे इंजेक्शन, जाणून घ्या इतके महाग का?


हल्ली उपचार हे खूप महागडं झालं आहे. औषधांच्या किंमती गगणाला भिडल्या आहे. अशात पुन्हा एकदा जगातील सर्वात महागडं औषध चर्चेत आलं आहे. Zolgensma असं या औषधीचं नाव असून या इंजेक्शनची किंमत ऐकूण भल्या-भल्यांच्या पायाखालची वाळू सरकते.

कारण या इंजेक्शनची किंमत हजार किंवा लाखात नसून तब्बल 17 कोटी रुपये आहे. ऐकूण धक्का बसला असेल मात्र, हे खरं असून हे इंजेक्शन जगातील सर्वात महागड औषध आहे. सध्या हे औषध चर्चेच आलं असून करण ठरलं ते दिल्लीच्या एका खासदाराचे आवाहन. 

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय सिंह यांनी लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. त्याचे हे आवाहन स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी (SMA) या आजाराने त्रस्त असलेल्या एका मुलाचे प्राण वाचवण्यासाठी आहे. मस्कुलर ऍट्रोफी या आजाराने ग्रस्त या मुलाला वयाचे दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी हे इंजेक्शन मिळाले तर त्याचा आजार बरा होऊ शकतो, नाही तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या आजारावर रामबाण ठरणाऱ्या या इंजेक्शनची किंमत तब्बल 17 कोटी रुपये आहे. यामुळे जगातील सर्वात महागडे औषध Zolgensma इंजेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ही वन-टाइम जीन थेरपी आहे. भारतात याला मान्यता नसली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि सरकारच्या मान्यतेनंतर आयात करता येते. भारतात या औषधीच्या एका डोसची किंमत 17 कोटी रुपये आहे. एका अंदाजानुसार, अलिकडच्या वर्षांत सुमारे 90 मुलांना हे इंजेक्शन देण्यात आले आहे.
Zolgensma हे औषध स्विस कंपनी नोव्हार्टिसने विकसित केले आहे. याचा वापर दुर्मिळ अनुवांशिक रोग SMA वर उपचार करण्यासाठी केला जातो. हा एक घातक रोग आहे. हे विशेषतः मेंदू आणि मनक्याच्या हड्डीच्या चेतापेशींना नुकसान पोहचवतो. एका अंदाजानुसार, अमेरिकेत 10,000 ते 25,000 मुले आणि प्रौढ या आजाराने ग्रस्त आहेत. आणि फारच कमी रुग्ण हे माहागडं औषध विकत घेऊ शकतात. जगात एसएमएच्या उपचारासाठी फक्त तीन औषधांना मान्यता देण्यात आली आहे. बायोजेन, नोव्हार्टिस आणि रोश या कंपन्या हे औषध बनवतात.

हे औषध इतके महाग का?
हे औषध महाग असण्यामाने प्रमुख कारण म्हणजे, या औषधाची बाजारपेठ खूपच लहान आहे. त्यात हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फार कमी कंपन्या हे औषध बनवतात आणि म्हणूनच त्याची किंमत खूप जास्त आहे. नोव्हार्टिसच्या वेबसाइटनुसार, हे औषध 45 देशांमध्ये मंजूर झाले आहे आणि आतापर्यंत जगभरात 2,500 रुग्णांवर उपचार केले गेले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.