Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" महाराष्ट्रात 100 किल्ल्यावर लँड जिहाद ", भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात

" महाराष्ट्रात 100 किल्ल्यावर लँड जिहाद ", भाजप आमदाराचं खळबळ उडवून देणारं वक्तव्य, विमानतळावरच पोलिसांनी घेतलं ताब्यात 


मुंबईतील भिवंडीत धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह मार्गदर्शक उपस्थित होते. नेहमीच वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या टी राजा यांनी या सभेतही आपल्या दाव्यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राती राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सभेत बोलताना टी राजा सिंह यांनी महाराष्ट्रातील मठ, मंदिरे आणि गड-किल्ल्यांवर भाष्य केले. ज्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

यावेळी राज म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी 370 किल्ले जिंकले होते. पण दुर्दैव असे आहे की, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच 100 किल्ल्यांवर मशीदी व दर्गे बांधण्यात आले आहेत." यावेळी टी राजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करत विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी गड-किल्ल्यांवरील मशीदी आणि दर्गे हटवण्याची विनंती केली आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या भाषणामध्ये आमदार राजा म्हणत आहेत की, "मुस्लिमांनी लँड जिहाद करत महाराष्ट्रातील 100 लहान-मोठ्या किल्ल्यांवर मशिदी आणि दर्गे बांधले आहेत. महाराष्ट्रात मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत आहे की, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या सर्व किल्ल्यांना लँड जिहादमुक्त करावे."

यावेळी हिंदू धर्मसभेत धर्मांतर बंदी कायदा, वक्फ बोर्ड कायदा , लव जिहाद विरोधी कायदा, गोहत्या बंदी कायदा मंजूर करण्याची मागणी करणारा ठराव पारित करण्यात आला. मुंबईहून हैदराबादमध्ये पोहचताच पोलिसांच्या ताब्यात दरम्यान भिवंडीतील कार्यक्रमानंतर टी राजा तेलंगणाला परतले. तेव्हा राजीव गांधी विमानतळावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारण मेडकमध्ये दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली आहे. यानंतर आमदार राजा सिंह हे मेडकमध्ये भाजप कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात होते. मात्र पोलिसांनी त्याला रोखले आणि नजरकैदेत ठेवले. याची माहिती खुद्द राजा सिंह यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.