सांगली : सांगलीतील मिरजेत बनावट नोटा बनविणार्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी याचा पर्दाफाश करून एकला अटक केली आहे. अहद मोहम्मद अली शेख असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 1 लाख 90 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
संशयित अहद शेख हा बनावट नोटा वापरात आणण्याासाठी सांगली बस स्थानकात येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अहद शेख याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्याने मिरजेत बनावट नोटांचा कारखानाच थाटल्याची बाब समोर आली होती. पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा बनविणार्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.