सामान्यपणे जास्तीत जास्त लोक एक लग्न करून आनंदाने संसार करतात. पण काही लोकांचं एका लग्नाने मन भरत नाही. ते एकापेक्षा जास्त लग्न करतात आणि सगळे मिळून सोबत राहतात. असंच एका व्यक्तीने केलं. ही व्यक्ती त्याच्या लग्नांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. या व्यक्तीला पाच बायका आहे. महत्वाची बाब म्हणजे या सर्व बायका आणि तो एकाच घरात एका छताखाली राहतात.
द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, बॅरेट फॅमिली सोशल मीडियावर चर्चेत असते. परिवारात १ पती आणि ५ पत्नी आहेत. सर्व महिला केवळ पतीसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत एकमेकींसोबत नाहीत. या पाच पत्नींपासून या व्यक्तीला १० मुलं आहेत. एकच पती असल्याने महिलांमध्ये कधीही हेवेदावे किंवा वाद होत नाहीत. हे सगळे नेहमीच सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात.
सोशल मीडिया प्लेटफॉर्म टिकटॉकवर या फॅमिलीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात पतीने सांगिलं होतं की, त्याच्या ५ पत्नी ५ वेगवेगळ्या स्वभावाच्या आहेत. महिला व्हिडीओत म्हणाल्या की, त्या केवळ त्यांच्या पतीवर प्रेम करतात आणि त्यांना आनंद आहे की, त्यांचा पती एकच आहे. त्यांचं असं मत आहे की, इतक्या पत्नी असल्यावर त्यांचा पती दुसऱ्या कोणत्याही महिलेच्या प्रेमात पडणार नाही.आता हा परिवार मिळून टिकटॉक आणि इन्स्टा अकाऊंट चालवतात. ते नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. एकापेक्षा जास्त पत्नी असल्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी ब्राझीलचा एक मॉडल आर्थर ओ ऊर्सोला 9 पत्नी आहेत तोही काही महिन्यांआधी चर्चेत होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.