Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलांना मासिक 1 हजार 200 रुपये देणारी ' लाडकी बहीण ' ही योजना राज्यात लवकरच कार्यन्वित होणार!

महिलांना मासिक 1 हजार 200 रुपये देणारी ' लाडकी बहीण ' ही योजना राज्यात लवकरच कार्यन्वित होणार!


महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाच गरीब महिलांना आर्थिकदृट्या स्वावलंबी करण्यासाठी ही योजना आखली जात असून, पहिल्या टप्प्यात दारिद्रय रेषेखालील ९० ते ९५ लाख महिलांना महिन्याला १२०० ते १५०० रुपये मिळणार आहे.

दारिद्रय रेषेखालील २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटितांना लाभ मिळणार आहे. सदर रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा सरकारचा मानस आहे. आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली असून, त्यासाठी समाजातील विविध घटकांसाठी नव्या आकर्षक योजना आणण्याची तयारी सुरू आहे. राज्यातील महिलांची मने आणि मते जिंकण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात ही योजना राबविण्याचे नियोजन आहे. या योजनेबाबत माहिती घेण्यासाठी सरकारने अधिकाऱ्यांचे एक पथक अलीकडेच मध्य प्रदेशला पाठविले असल्याची माहिती आहे.
या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रतिमहिना 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.दारिद्रयरेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. महिलांना आर्थिक दृष्ट्‍या स्वावलंबी करून त्यांची मदत करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे.

मध्यप्रदेशात या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1250 रुपये दिले जातात. याच धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांना खूश करण्यासाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' ही योजना अंमलात आणण्यासाठी महायुती सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे. याकरता या योजनेची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्रातून अधिकाऱ्यांचं पथक अलीकडंच मध्यप्रदेशला जाऊन आलं. या पथकानं मध्यप्रदेशमधील 'मुख्यमंत्री लाडली बहना' या योजनेचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेसाठी आराखडा तयार करण्यात आला. 27 जूनपासून सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये : समाजातील आर्थिक, दुर्बल घटकातील महिलांसाठी ही योजना महत्त्वाची असणार आहे. या योजनेमुळे महिला स्वतः आत्मनिर्भर होणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1200 ते 1500 रुपये लाभार्थीच्या बँक खातात थेट जमा होणार आहेत. दारिद्र्य रेषेखालील 21 ते 60 वर्ष वयोगटातील 90 ते 95 लाख महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.