धक्कादायक! पुणे अपघातानंतर आणखी एका 'बिझनेसमॅन'ची मुजोरी, पाहा Video
पुण्यातील एका मोठ्या उद्योगपतीच्या 'बाळा'ने कोरेगाव पार्क भागात दोन दुकाचीस्वारांना भरधाव कारने उडवलं. या अपघातात दोन्ही दुचारीस्वारांचा मृत्यू झाला. तब्बल 200 च्या स्पीडने कार चालवत अल्पवयीन तरुणाने दोन नागरिकांचा जीव घेतला. एवढंच नाही तर बिझनेसमॅनच्या अल्पवयीन तरुणाला जामीन देखील मिळाला. या प्रकरणात ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्ह्यात विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अशातच आता पुण्याचं प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत आणखी एक धक्कादायक प्रकार लखनऊमधून समोर आलाय. एका बिझनेसमॅनने भर रस्त्यात पिस्तुल काढून एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध एका व्यक्तीला मारहाण करताना दिसतोय. कारला धडक दिल्याने बिझनेसमॅनला राग आला अन् त्याने थेट पिस्तुल काढली. आरोपी बिझनेसमॅनचं नाव विनोद मिश्रा असल्याची माहिती समोर आलीये. पिस्तुलीच्या बटाने या विनोद मिश्राने दुचाकीस्वार तरुणाला मारहाण केली. त्यावेळी त्याने कॉलर धरली अन् पिस्तुलाचा धाक दाखवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रकीब शुक्ला नावाचा व्यक्ती मागून येत होता. सफारी वॅगनआरला पाठीमागून धडकली.
विनोद मिश्रा आणि रकीब शुक्ला या दोघांच्यात शाब्दिक वाद पेटला. त्यावेळी रस्त्यावर दोघांची हाणामारी सुरू झाली. दोघांनी एकमेकांना शिवागाळ केली अन् वाद पेटला. त्यानंतर विनोद मिश्राने पिस्तुल काढली अन् रकीबला चोप दिला. पिस्तुल बघून रकीब देखील घाबरला होता. त्यावेळी आसपासचे नागरिक फक्त प्रेक्षक म्हणून संपूर्ण प्रकार बघत होते.
दरम्यान, विनोद मिश्रा हा आरोपी नेमबाज असल्याची देखील माहिती मिळाली आहे. संपूर्ण प्रकरणानंतर विनोद मिश्राला पोलिसांनी पकडलं अने जेलबंद केलंय. पोलिस आपली पुढील कारवाई करत असल्याची माहिती देण्यात आलीये. त्याच्याकडून शस्त्रही पोलिसांनी जप्त केलंय. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली जातीये. गुंडगिरीचा हा व्हिडिओ सोशलवर मात्र सध्या चर्चेचा विषय आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.