कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्यावर राजभवनातील कर्मचारी महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. पोलिस पीडित महिलेशी बातचीत करणार असून, त्यांनी राजभवनाकडे सीसीटीव्ही फुटेज देण्याची विनंती केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही याप्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील काही दिवसांत आम्ही काही साक्षीदारांशी बातचीत करणार आहोत.
एसआयटीने राजभवनातील चार कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले आहे. शनिवारी हरे स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये या चौघांचे जबाब नोंदवण्यात आले. राज्यघटनेच्या कलम ३६१ नुसार विद्यमान राज्यपालांविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. राजभवनकडून निवेदन जारी करून पोलिसांना राजभवनात प्रवेशासाठी मानाई केली आहे. नेत्यांना खुश करण्यासाठी लोक चुकीच्या पद्धतीने याचा तपास करू शकतात, यात म्हटले आहे. बोस हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. २३ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
महिलेचे नेमके म्हणणे काय आहे?
* राजभवनात काम करणाऱ्या महिलेचा आरोप आहे की, २४ मार्च रोजी कायमस्वरूपी नोकरीचा अर्ज देण्यासाठी भेटीसाठी गेले असताना राज्यपालांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले.* असाच प्रकार गुरुवारी पुन्हा घडल्यानंतर राजभवनाबाहेरील पोलिसांकडे तक्रार नोंदविली.पीडित महिला राजभवनात काम करते. या प्रकारच्या घटना रोज घडत आहेत; परंतु मी आजवर काही बोलले नाही; परंतु हे प्रकरण वेगळे आहे. राज्यपालांनी दोन वेळा महिलेचे लैंगिक शोषण केले आहे. मी तिचे अश्रू पाहिले आहेत. ती महिला घाबरली आहे. राजभवनात काम करणार नाही, असे ती आता म्हणत आहे.- ममता बॅनर्जी,मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.