पुण्यातील विशाल अगरवाल या बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे आलीशान पोर्श कारने चालवत दोन जणांना चिरडून मारल्याच्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. या प्रकरणात आता आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहे. या प्रकरणात बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुणे पोलिस आयुक्तांना फोन केल्याचा आरोप केला जात आहे.
याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे हे रात्री ३ वाजता पोलीस ठाण्यात पोहोचले, यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अपघाताच्या दिवशी या पोर्श कार मधून बिल्डर पुत्रासोबत एका आमदाराचा मुलगाही प्रवास करत होता असल्याचे म्हटले आहे. अपघातानंतर कारमधून दोघेजण खाली उतरले. दुसरा कोण होता हे सरकारने उघड करावे. एवढेच नाही तर या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
नाना पाटोले म्हणाले, म्हणाले की, बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले, असे मानण्यास आपल्याकडे अनेक कारणे आहेत. याचे कारण बिल्डरचे सत्ताधारी पक्षांशी चांगले संबंध आहेत. पुण्यातील ससुन रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे याचे एका नेत्याशी संबंध आहे. तावरेला सोमवारीच अटक करण्यात आली असून त्याच्यावर अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे. यापूर्वी याच रुग्णालयात ड्रग माफिया ललित पाटील यांना पंचतारांकित सुविधा देण्यात आल्या होत्या. अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी या डॉक्टरच्या नियुक्ती करण्यासाठी शिफारस पत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना दिले होते. 'सुनील टिंगरे यांनी आणि मंत्रिमंडळ सदस्याची तावरे यांच्या नियुक्तीत महत्त्वाची भूमिका होती. असे डॉक्टर आणण्यामागे काही भूमिका होती का आणि नावाची शिफारस कोणी केली हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवे.
नाना पटोले म्हणाले, ससुन रुग्णालय हे गुन्हेगारांचे पंचतारांकित हॉटेल बनले आहे. नागपूर, जळगाव, पुण्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत, पण धक्कादायक बाब म्हणजे आरोपींना तात्काळ जामीन मिळावा यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे पुणे कार अपघाताचा तपास सीबीआयने करावा, असेही ते म्हणाले. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोपही त्यांनी केला. अल्पवयीन आरोपीसोबत एका आमदाराचा मुलगाही होता, असा दावा त्यांनी केला.नाना पटोले यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील आरोप केले. फडणवीस यांचे मूळ गाव असलेल्या नागपुरात दोन मुलींनी दोन तरुणांनी कारने चिरडून ठार मारले. मात्र, त्यांना काही दिवसातच जामीन मिळाला. पुण्यात अवैध ड्रग्ज रॅकेट सुरू आहे. पुणे आणि नागपुरात बेकायदा पब सर्रास सुरू आहेत. कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातील ३६ बेकायदा पब पाडावे लागले. भाजपने गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुणांना बरबाद केले आहे. इंदापूरमध्ये तहसीलदारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गुन्हेगारांना एवढी हिंमत कुठून मिळते? राजकीय आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही, असा दावा पटोले यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.