Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

BSF मध्ये ऑफिसर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला मिळेल 2,00,000 पगार

BSF मध्ये ऑफिसर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला मिळेल 2,00,000 पगार 


सीमा सुरक्षा दलामध्ये अधिकारी पदावर नोकरी मिळविण्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. यासाठी बीएसएफनं इंजिनीअर आणि लॉजिस्टिक ऑफिसर्ससाठी 'बीएसएफ' एअर विंगमध्ये ग्रुप 'ए'मध्ये कॉम्बॅटाइज्ड पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्त जागांमध्ये डेप्युटी चीफ इंजिनीअर (उपमुख्य अभियंता), सीनिअर एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअर (वरिष्ठ विमान देखभाल अभियंता) आणि असिस्टंट कमांडंट (लॉजिस्टिक) या पदांचा समावेश आहे. ज्या पात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज दाखल करण्याची इच्छा असेल, त्यांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करता येईल.


'बीएसएफ'च्या या भरतीसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर 31 डिसेंबरपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करणं अपेक्षित आहे. या भरती अंतर्गत एकूण 12 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. जर या पदांसाठी अर्ज भरण्याचा विचार करत असाल तर पुढे दिलेल्या काही गोष्टी प्रथम लक्षपूर्वक वाचा.

'बीएसएफ'मध्ये या पदांसाठी भरती होणार आहे

उपमुख्य अभियंता - 03 जागा
वरिष्ठ विमान देखभाल अभियंता - 07 जागा
असिस्टंट कमांडंट (लॉजिस्टिक) - 02 जागा

'बीएसएफ'मध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक अर्हता

'बीएसएफ'च्या या भरती मोहिमेअंतर्गत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज भरायचा असेल, त्यांच्याजवळ अधिकृत निवेदनात दिलेली संबंधित पात्रता असणं आवश्यक आहे.

'बीएसएफ'मध्ये वयाच्या किती वर्षापर्यंत अर्ज करता येईल?

उपमुख्य अभियंता - वय 52 वर्षांपेक्षा अधिक असू नये.
वरिष्ठ विमान देखभाल अभियंता - वय 50 वर्षांपेक्षा अधिक असू नये.
असिस्टंट कमांडंट (लॉजिस्टिक) - वय 35 वर्षांपेक्षा अधिक नसावं.

'बीएसएफ'मध्ये अशा प्रकारे होईल निवड

'बीएसएफ' एअर विंग पदांसाठी निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक टप्प्यांचा समावेश आहे. सुरुवातीला पात्रता निश्चित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर योग्य उमेदवारांसाठी एक लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल.

'बीएसएफ'मध्ये निवड झाल्यानंतर मिळणारं वेतन किती असेल?

उपमुख्य अभियंता - 1,23,100 रुपयांपासून 2,15,900 रुपये

वरिष्ठ विमान देखभाल अभियंता - 78,800 रुपयांपासून 2,09,200 रुपये

असिस्टंट कमांडंट (लॉजिस्टिक) - 56,100 रुपायांपासून 1,77,500 रुपये

सरकारी नोकरी मिळविण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. ते पूर्णत्वास नेण्यासाठी 'बीएसएफ'नं उत्तम संधी निर्माण करून दिली आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण असल्यास भविष्यात देशसेवेसाठी उत्तम काम करण्याची संधी मिळू शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.