मुरादाबाद (उत्तरप्रदेश): येथील समाजवादी पक्षाचा नेता आसिफ अली याने समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराच्या मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. यासोबतच त्याने पीडित तरुणीला धमकावून सतत ५ वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिच्याकडून ६ कोटी रुपये उकळले.
अंततः पीडित ३० वर्षीय तरुणीने तिच्या पतीला याविषयी माहिती सांगितली. त्यानंतर महिलेने आरोपीच्या विरोधात सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अली आणि त्याचा भाऊ यांच्यासह ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
१. पीडित तरुणीचे वडील दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. पीडित तरुणीचा ११ वर्षांपूर्वी कानपूर येथील एका व्यावसायिकाशी विवाह झाला होता.२. वर्ष २०१९ मध्ये तिचे वडील आजारी पडले, तेव्हा पीडित तरुणी त्यांची काळजी घेण्यासाठी मुरादाबादला आली होती. आसिफ अली हा पीडितेच्या माहेरच्या घरी येत-जात होता.३. या वेळी अली याने तरुणीशी जवळीक साधली. त्यानंतर संधी साधून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. पीडितेच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले.४. या घटनेनंतरही अली माझ्याकडून पैसे उकळत आहे. 'पैसे न दिल्यास अॅसिड ओतण्याची धमकीही तो देत आहे', असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.पक्षाच्याच माजी आमदाराच्या मुलीवर बलात्कार करणार्या अशा वासनांध नेत्यावर पक्षश्रेष्ठी काय कारवाई करणार कि मुसलमानांना वाईट वाटेल; म्हणून समाजवादी पक्ष त्याला चुचकारत बसणार ?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.