आंध्र प्रदेशातील विजयवाडमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. येथे एकाच घरात चार मृतदेह विखुरलेले पडले होते. य़ामध्ये दोन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश होता. या सगळ्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
तसेच यापैकी एक मृतदेह फासावर लटकलेला होता. हे हृदयद्रावक दृश्य आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका डॉक्टर कुटुंबाचे आहे. या पाच जणाच्या मृत्युमुळे परिसरात भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू केला आहे.
सदर घटना ही मंगळवार, 30 एप्रिल रोजी घडली. गुरुनानक नगरमध्ये राहणारे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रीनिवास (40) यांनी त्यांच्या कुटुंबीयांची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. या घटनेत डॉ. श्रीनिवाससह त्यांची पत्नी उषा, दोन मुले शैलजा (9) आणि श्रीहान (8) आणि आई रमणम्मा यांना आपला जीव गमवावा लागला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या घरी काम करणारी मोलकरीण घरी आली. मोलकरणीने घरात डोकावले असता तिला डॉ.श्रीनिवास बाल्कनीत लटकलेल्या अवस्थेत दिसले. हे दृश्य पाहून ती घाबरली आणि ओरडू लागली.
मोलकरणीचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. डॉक्टरांच्या घराची अशी अवस्था पाहून लोकांनी लगेचच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी देखील लगेचच घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे पोलीस आयुक्त रामकृष्ण यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.