आजपासून नवा महिना चालू झाला आहे. या नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशबर मिळाली आहे. आता व्यवसायिक गॅस सिलिंडरचा भाव कमी करण्यात आला आहे. दुसरीकडे या महिन्यापासून बँकांनीही आपले अनेक नियम बदलले आहेत.
तेल आणि गॅस क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सिलिंडरच्या दरात 19-20 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. IOCL च्या संकेतस्थळावर हे नवे दर देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी 1 मे रोजीपासून केली जाणार आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.