Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' लुटेरी दुल्हन' अनेकांना ब्लॅकमेलिंग :, अनेकांना लावलंय चुना

' लुटेरी दुल्हन' अनेकांना ब्लॅकमेलिंग :, अनेकांना लावलंय चुना 


फेसबुकवरून ओळखी करीत, अनेकांना प्रेमाचा जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करीत, जबरदस्ती लग्न करून लाखोंच्या चुना लावणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'ला गिट्टीखदान पोलिसांनी उच्च न्यायालयातून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच, तिची तब्येत खराब झाल्याने मेयोमध्ये दाखल करण्यात आले. दीड महिन्यापूर्वी गिट्टीखदान पोलिसांनी महिलेसह नातेवाईकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

समीरा फातिमा वल्द मुक्तार अहमद, आई रेहाना जमाल, काका मौसिन अन्सारी, त्यांची पत्नी, हरीश, वसीम, वसीम शेख अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान परिसरात सुलेमान (वय ४९, बदललेले नाव) यांचा प्रॉपर्टीचा व्यवसाय करणाऱ्यास समीरा फातीमा व्हिडीओ आणि फोटोद्वारे ब्लॅकमेलिंक करीत त्यांच्यासोबत लग्नासाठी गळ घातली.


मात्र, त्यांनी नकार दिल्यावर थेट नातेवाइकांसोबत घरी येऊन तमाशा केला. याशिवाय सर्वत्र बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने लग्न करण्यासही भाग पाडले. मात्र, काहीच दिवसात तिच्यासह नातेवाईक प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू लागले. शिवाय सातत्याने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, ५० लाखाने लुबाडले. 

मात्र, एक दिवस बिंग फुटल्याने समीरा अशाच प्रकारे पुरुषांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान समीरा या गुरुवारी उच्च न्यायालयात एका प्रकरणात तारखेवर आल्या असल्याची माहिती गिट्टीखदान पोलिसांना मिळाली.

त्यांनी सापळा रचून समीराला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच, तिची तब्येत बिघडली. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आणखीच तब्येत बिघडल्याने पोलिसांनी मेयोतील वार्ड क्रमांक सहामध्ये दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक तलवारे यांनी दिली. तिची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू केले आहे.

फोन आला अन् बिंग फुटले 

समीराकडून सुलेमानला ब्लॅकमेल करणे सुरू असताना, १२ डिसेंबरला २०२२ ला पाचपावली पोलिसांकडून तिच्या मोबाइलवर फोन आला. या फोनमुळे ती घाबरून गेली. ही बाब सुलेमानच्या निदर्शनास आली. यावेळी त्याने विचारणा केल्यावर तिने पोलिस ठाण्यातून फोन आल्याचे सांगितले. मात्र, ती स्वतः ठाण्यात जाते अस सांगून निघून गेली. सुलेमानने चौकशी केल्यावर तिचे लग्न झाले असून तीन महिन्यांपूर्वी तिने अमानुल्ला खान यांचेशी विवाह केल्याची माहिती समोर आली. यावेळी तिची हकिकत समोर येऊन तिने आत्तापर्यंत सात जणांशी लग्न करून त्यांच्याकडून पैसे वसूल केल्याचीही माहिती समोर आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.