Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोल्डी ब्रार जिवंत ! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच अमेरिकन पोलिसांचा खुलासा

गोल्डी ब्रार जिवंत ! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच अमेरिकन पोलिसांचा खुलासा


मुंबई : दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या झाली आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. अशातच आता अमेरिकेर्तील पोलिसांनी नुकताच एक खुलासा केला आहे. अमेरिकेत झालेल्या गोळीबारात गोल्डी ब्रारचा नाही तर एका आफ्रिकन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


अमेरिकन पोलिसांनी गोल्डी ब्रारच्या हत्येसंबंधीचा रिपोर्ट हा पूर्णपणे खोटा असल्याचा खुलासा केला आहे. अमेरिकेतील कैलिफोर्नियामध्ये ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे तो गोल्डी ब्रार नव्हता, याची आम्ही पुष्टी करतो, असे पोलीस म्हणाले. गोल्डी ब्रारच्या हत्येची अफवा कशी पसरली हे आम्हाला माहीत नाही. विविध वेब साइट्सनं आमच्याकडून कोणतीही पुष्टी न करता गोल्डी ब्रारच्या हत्येच्या बातम्या पसरवण्यास करण्यास सुरुवात केली, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

गँगस्टर गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग उर्फ सतींदर सिंगजीत सिंग असं आहे. गोल्डी ब्रार हा पाकिस्तानच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया करतो. अनेक हत्या आणि शस्त्रास्त्र तस्करीतच्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे. गोल्डी ब्रार हा सध्या अमेरिकेत असून तेथून तो पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि कॅनडामध्ये सातत्याने गुन्हेगारी काया करत आहे. चंदीगडमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर गोल्डी ब्रारने गुन्हेगारीच्या विश्वात प्रवेश केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.