सांगली दिनांक ३० मे 2024 : मनुस्मृतीला विरोध करण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. त्यांचा हेतू आणि उद्देश स्पष्ट झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आज भारतीय जनता पक्षातर्फे येथे करण्यात आली.
भाजपा सांगली शहर तर्फे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांनी आजपर्यंत अनेकदा अनेक महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीव पूर्वक अवमान केला असून त्याबद्दल त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. मनुस्मृतीला विरोध हे केवळ एक निमित्त होते. जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान विभूतीचाच अवमान केला आहे. प्रशासनाने आता कोणतीही चालढकल न करता त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराजभैय्या पवार, माजी नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे सुबरावतात्या मद्रासी, युवराज बावडेकर, विलास सर्जे, सरचिटणीस विश्वजीत पाटील, अविनाश मोहिते, महिला आघाडीच्या स्वातीताई शिंदे, माधुरी वसगडेकर, काजल कांबळे, राष्ट्रवादी महिला मोर्चाच्या जयश्री पाटील, दीपक कांबळे, शुभम जाधव, अमित देसाई, प्रविण जाधव, मोहन जामदार, उदय मुळे, प्रफुल ठोकळे, रेखा पाटील, रविंद्र वादवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.