Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भिजवलेला सुकामेवा खाण्याचे फायदे

भिजवलेला सुकामेवा खाण्याचे फायदे 


सुका मेवामध्ये विविध जीवनसत्त्वे तसेच विविध खनिजे आढळतात. भिजवलेल्या सुकामेव्यामध्ये अधिक प्रमाणात पौष्टिक गुणधर्म असतात. जाणून घ्या भिजवलेला सुकामेवा खाण्याचे फायदे - भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 घटक मुबलक असतात. त्यामुळे हृदयाचे आजार आटोक्यात राहतात. अंजीरमध्ये कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते. अंजीरमधील पोटॅशियम घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. अंजीरमुळे शक्ती, उर्जा वाढते सोबतच एजिंगचा त्रास कमी करण्यास मदत करतात.



भिजवलेले मनुके खाण्याचे फायदे 

ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्या लोकांनी मनुके खावेत. रात्रभर मनुके भिजत ठेवा अन् सकाळी उठल्यावर ते मनुके रिकाम्या पोटी खा. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय तुमच्या पोटावरची चरबीही कमी होते. रात्रभर भिजत ठेवलेले मनुके खाल्ल्याने पोट चांगले राहते. सकाळी उठल्यानंतर मनुके खा. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. शिवाय मनुके खाल्ल्याने शरीराला खूप फायबर आणि पोषकतत्त्वे मिळतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. ज्या लोकांना अशक्तपणाचा त्रास जाणवतो अशा लोकांनी दररोज सकाळी उठल्यानंतर मनुके खावीत. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढे पोषकतत्वे मिळतात. त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. भिजवलेले मनुके नियमित खाल्ल्यास डोळे निरोगी होऊ शकतात. केस गळती वा केस तुटणे अशा समस्या असतील तर भिजवलेले मनुके खा. त्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. शिवाय केसांची चमक वाढते.

भिजवलेले काजू खाण्याचे फायदे 

भिजवलेल्या काजूमध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर हे घटक मोठ्या प्रमाणात असतात.  भिजवलेल्या काजूचे नियमित सेवन त्वचेसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. भिजवलेल्या काजूमध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. मात्र यासाठी भिजवलेले काजू खावेत. भिजवलेल्या काजूमध्ये ल्यूटिन आणि ॲंटी-ऑक्सीडेंट गुण असतात. काजूतील पोषक गुणधर्मांमुळे, सूर्यकिरणांमुळे डोळ्यांची जी हानी त्यापासून संरक्षण मिळते. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते, दृष्टी चांगली होते. भिजवलेल्या काजू बुध्दीवर्धक, स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त आहेत. काजूमध्ये ब्रेन बूस्टर पोषक घटक असतात, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण वाढण्यासाठी मदत करतात.

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे 

नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्याने चयापचय वाढते आणि शरीरातील चरबी जलद बर्न होते. बदामांमध्ये उच्च फायबर, चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, त्यामध्ये ग्लूकोजचे प्रमाण बरेच कमी असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास खूप उपयुक्त ठरते. भिजवलेल्या बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ए जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते तर व्हिटॅमिन ए त्वचेतील कोलेजन वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा थंड आणि चमकदार होते.

भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे 

भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. एक अभ्यासानुसार दररोज 28 ग्रॅम अक्रोड खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो. कोलेस्टेरॉल कमी करणे, मेंदूची शक्ती वाढवणे, कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही भिजवलेल्या अक्रोडमुळे मोठ्या प्रमाणात कमी होतो.  भिजवलेले अक्रोड खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. यामुळे हृदयविकाराचा धोका घटतो. भिजवलेले अक्रोड फक्त हृदयासाठीच नाही तर टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.