हिंगोली : - सापडलेला मोबाईल वापरल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागून 5 हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागातील पोलीस अंमलदारावर हिंगोली एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दिपक हरिदास पाटील (वय 36 रा. रामकृष्णा सिटी, बळसोंड, हिंगोली ता.जि. हिंगोली) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे.
याबाबत 34 वर्षीय व्यक्तीने 9 सप्टेंबर 2023 रोजी हिंगोली एसीबीकडे तक्रार केली आहे. दिपक पाटील याने 24 एप्रिल 2024 रोजी फोन पे द्वारे लाचेची रक्कम स्वीकारली. तक्रारदार हे मौजे बोरी शिकारी ता.जि.हिंगोली येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार हे मार्च 2023 मध्ये हिंगोली ते सायाळा गावाकडे जात होते. त्यावेळी गारमाळ उड्डाण पुलाजवळ त्यांना एक मोबाईल सापडला होता. तो मोबाईल तक्रारदार हे त्यांच्या मेहुणे यांच्या नावावर असलेले सिम कार्ड टाकून वापरत होते.
दरम्यान, 22 एप्रिल 2023 रोजी तक्रारदार यांना सायबर सेल हिंगोली येथून पोलीस अंमलदार आरोपी दिपक पाटील यांनी सापडलेला मोबाईल घेऊन सायबर सेल हिंगोली येथे बोलविले. त्यानंतर तक्रारदार हे मोबाईल घेऊन दिपक पाटील यांच्याकडे गेले असता, दिपक पाटील यांनी तक्रारदार यांना सापडलेला मोबाईल जमा करण्यास सांगितले. तक्रारदार हे मोबाइल गैर पद्धतीने वापरत असल्याचे सांगुन त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपी दिपक पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे गेले असता, दिपक पाटील यांनी तक्रारदार यांना सापडलेला मोबाईल जमा करण्यास सांगितले. तक्रारदार हे मोबाइल गैर पद्धतीने वापरत असल्याचे सांगुन त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपी दिपक पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयाची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 5 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे 22 एप्रिल 2023 रोजी बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी दिपक पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून फोन पे द्वारे पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.